
👉 makepresence.online ऑनलाईन स्वतःच अस्तित्व तयार करा
आज मी माझा एक अगदी खरा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय – Online Branding: मी सुरुवात कशी केली? कुठून सुरुवात केली? आणि अजून कुठपर्यंत पोहोचायचं आहे, ते मला कसं साध्य करायचं आहे?
सुरुवातीला ऑनलाईन ब्रँडिंगच्या मोठमोठ्या गप्पा, मोठमोठ्या ब्रँड्सची उदाहरणं पाहून मला वाटायचं की हे फक्त मोठ्या लोकांचंच काम आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं हे काम नाही. पण काम करताना लक्षात आलं की लोक मला Excel विषयी प्रश्न विचारतात, AI म्हंटलं कि माझे कां लगेच टवकरतात.
डिजिटल मार्केटिंग म्हटलं की मला आजूबाजूचे छोटे व्यवसाय दिसू लागतात आणि त्यांना त्यांचा व्यवसाय Online घेऊन जायला मदत करावीशी वाटते. तेव्हा वाटलं की या विषयावर काहीतरी लिहावं, इतरांना सांगावं. आणि तेव्हाच मनात ठरवलं — काहीतरी करायचंच!
१. सुरवात – काहीतरी ऑनलाईन निर्माण करण्याची इच्छा – माझं सर्वात पहिला लक्ष हेच होता कि – स्वतःच काहीतरी असावं इंटरनेटवर (इंस्टाग्राम,फेसबुक अकाउंट वगैरे नाही :-)) पण जे लोकांना उपयोगी वाटेल म्हणून मी हल्लीच एक डोमेन घेतल..माझा विचार एकदम साधा आणि सरळ होता स्वतः शिकायचं आणि लोकांना मदत करायची कसं होणार हे तर जर “लोकांना कन्टेन्ट मध्ये value दिसली तर ओळख हळू हळू का होईना तयार होणारच“.
मी Hostinger वर स्वतः website तयार केली आणि कोडिंग तर फारसं येत नव्हतं, पण प्रयत्न केला तर नक्की जमेल – थिम समजून घेतल्या, सेक्शन्स तयार केले, आणि ब्लॉग लिहायला सुरवात केली.
२. विषयाची निवड – जे येत तेच देता पण येईन असा विचार आला -आज इंटरनेटवर हजारो niche (विषय आहेत. पण मी निवड केली एक्सेल, AI Tools , डिजिटल मार्केटिंग यावर, कारण हेच मला येत, आवडत, आणि शिकतोय . काही ब्लॉग्स मी लिहिले .. परत काही बदल केले आणि परत लिहिले.
- Excel मध्ये इनव्हॉइस बनवण्याचं गाइड
- Free Excel Template – खर्च ट्रॅकर
- ChatGPT चं वापर करून वेळ वाचवण्याचे उपाय
- डिजिटल मार्केटिंग शिकण्याची ५० दिवसांची योजना
हे सगळं मी स्वतः वापरून, समजून, अनुभवून मगच लिहिलं आहे.

३. माझी ओळख: अजून मला लोकं ओळखत नाही आणि हे खार आहे तरी पण
- मी Instagram वर पोस्ट टाकतो
- ब्लॉग लिहितो
- वेबसाइट सुधारतो
अजून काही viral झालं नाहीये, followers नाहीयेत, पण ह्यातून मी शिकतोय. consistency ठेवावी लागणार आहे. अजून लोक मला ओळखत नाहीत ..म्ह्णून तर डोमेन घेतल त्याच नावातच माझा उद्दिष्ट मांडला make presence online . आज पोस्ट वाचणारे आज ३ लोक असतील ,उद्या तेच ३० होतील… नक्कीच!
४. SEO अजून शिकायचं आहे पण सुरवात केली आहे: पण सुरवात केली आहे- पण सुरवात केली आहे

५. माझं makepresence.online – फक्त एक वेबसाइट नाही, एक सुरुवात आहे माझ्या
वेबसाईटवर सध्या खालील गोष्टी आहेत:
- ब्लॉग्स – Excel, डिजिटल मार्केटिंग आणि AI Tools विषयावर
- Free Templates – Google Sheets आणि Excel Sheet फॉर्मेट्स
- Services – वेबसाईट बनवण्यात मदत, कंटेंट राइटिंग
- फॉर्म्स – ज्यातून लोक feedback देऊ शकतात, किंवा contact करू शकतात
हे सगळं मी हळूहळू तयार केलंय – कोणतंही external team नाही, मी एकट्याने केलंय.
६. मी काय शिकलो? –सुरुवात मोठी असावी लागत नाही
- एक साधा डोमेन, काही ब्लॉग्स, आणि मनापासून लिहिलेली माहिती – एवढं पुरेसं आहे.
- लोक लगेच ओळखणार नाहीत – पण consistency ओळखते
- तुम्ही सातत्याने मूल्य देत राहिलात, की recognition आपोआप येतं.
- आपण जे खऱ्या मनाने शेअर करतो, त्याला इंटरनेटवर मूल्य आहे
- AI tone नाही, clickbait नाही – फक्त सत्य आणि स्वअनुभव.
७. पुढचा टप्पा – लोकांपर्यंत पोहोचणं माझा पुढचा goal हा आहे:
- SEO properly शिकायचं
- nstagram reels आणि carousel पोस्ट सुरू ठेवायच्या
- mail list तयार करायचीआणि वेबसाईटवर अधिक उपयोगी कंटेंट आणायचा
८. सुरुवातीच्या अडचणी – आत्मविश्वास हरवतोय का? सुरुवात
करताना सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे – “मी करतोय ते योग्य आहे का?” हा प्रश्न.
- पोस्ट लिहून झाल्यावर वाटायचं – कोणी वाचेल का हे?
- वेबसाइट लाईव्ह केली पण traffic शून्य – “म्हणजे काहीतरी चुकतंय का?
- दुसरे content creators बघून वाटायचं – मी कुठं उशिरा आलोय का?
९. मी काय टाळतोय – जे सुरुवातीला चुकलं सुरुवातीला मी थोडा घाईघाईने गोष्टी केल्या होत्या:
- अनेक विषयांवर एकाचवेळी लिहायचा प्रयत्न
- फालतू plugins install करून वेबसाइट हळू केली
- Google ranking मिळवण्यासाठी keyword stuffing केला
१०. युनिक काय ठेवलंय मी?
- मराठीतून उपयोगी कंटेंट देणं: जास्तीत जास्त लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळावी, हीच माझी प्राथमिकता आहे.
- फ्री टेम्प्लेट्स:Excel किंवा Google Sheets मध्ये तयार केलेले टेम्प्लेट्स जे रोजच्या वापरासाठी उपयोगी पडतात – हे मी स्वतः बनवलंय.
- डिजिटल डायरीसारखा ब्लॉग:प्रत्येक पोस्ट मध्ये एक वैयक्तिक दृष्टिकोन देतो – जे वाचणाऱ्याला relatable वाटावं, अशी मांडणी करतो.
११. तुम्हाला सुरुवात करायची आहे का? जर तुम्ही वाचून असं वाटत असेल की, “आपण पण काहीतरी सुरू करावं”
तर मला आनंद होईल तुमची मदत करायला. सुरुवातीचे ५ action points:
- एक niche निवडा – तुम्हाला काय जमतं, काय आवडतं?
- डोमेन घ्या – तुमचं नाव किंवा ब्रँडसारखं काहीतरी
- फ्री Hostinger/WordPress थीम वापरून ब्लॉग बनवा
- प्रामाणिक कंटेंट लिहा – Google नाही, माणसांना टार्गेट करा
- Instagram/Facebook वर एकच मेसेज – “मी हे देतो/शिकवतो”
१२. हे सगळं का शेअर करतोय?
मी अजून मोठा नाही झालो. Viral झालो नाही. पण प्रत्येक गोष्टीमागे मेहनत, चुकलेले प्रयत्न, आणि पुन्हा उभं राहणं आहे. हे पोस्ट मी लिहितोय – “मी कुठून आलोय” हे विसरू नये म्हणून, आणि तुम्ही “कुठून सुरुवात करावी?” हे विचारत असाल, तर दिशा मिळावी म्हणून.
निष्कर्ष – ब्रँडिंग म्हणजे नुसतं पोस्ट टाकणं नव्हे, ब्रँडिंग म्हणजे स्वतःची एक ओळख बनवणं – जी विश्वासार्हतेवर आधारित असते. मी अजून वाटचाल करतोय – पण ही वाट मी स्वतःची केली आहे.
makepresence.online ही वेबसाइट माझी “Online ओळख” बनते आहे. आणि हा ब्लॉग – माझा “खरा अनुभव “. तुम्हालाही माझंही इतर ब्लॉग पाहायचं असेल किंवा मी तयार केलेले templates हवे असतील, तर मला नक्की संपर्क करा.
मी एकटाच शिकतोय आणि तुमच्यासारखे वाचकच माझं online बळ आहेत.
Pingback: Social media Branding strategy
Pingback: ऑनलाइन ब्रँडिंग: ब्रँड विश्वास निर्माण करण्याच्या ५ शक्तिशाली स्ट्रॅटेजीज