
आजच्या काळात लोक एखादं प्रॉडक्ट विकत घेताना त्याची फक्त किंमत न पाहता, त्या ब्रँडवरचा विश्वास( online presence ) पाहतात. आणि हाच विश्वास निर्माण होतो – चांगल्या ब्रँडिंगमधून.
होय! आपण सगळेच ऑनलाइन खरेदी करताना किंमत बघतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं – त्या ब्रँडची ओळख आणि विश्वासार्हता. आज ग्राहक इतका जागरूक झालाय की तो विचारतो – “हे प्रॉडक्ट चांगलं आहे का?”, “लोक काय म्हणतात?”, “ह्या कंपनीबद्दल माहिती काय आहे?”, “Instagram वर त्यांची प्रोफाइल आहे का?”
हाच online presence म्हणजे तुमच्या ब्रँडिंगचा पाया आहे. जसं TATA किंवा Parle-G या ब्रँडवर आपोआप विश्वास बसतो, तसंच आपल्या छोट्या व्यवसायासाठीसुद्धा हाच विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट टाकतो पण response नाही? कारण फक्त पोस्ट टाकणं म्हणजे ब्रँडिंग नाही!
“मी रोज Instagram ला पोस्ट करतो… तरी कोणी reply करत नाही!”
“Reels बनवतो, पण views येत नाहीत!”
“Story टाकली, पण कोणी बघत नाही!”
हे प्रश्न अनेक छोटे व्यावसायिक, कलाकार, freelancer किंवा content creator विचारतात. पण उत्तर एकच –
फक्त माहिती देणं पुरेसं नाही. लोकांशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे.
म्हणजे काय? लोकांनी बघितलं आणि स्क्रोल केलं – याचा अर्थ तुमचं content connect करत नाही.
लोक तेव्हा थांबतात, जेव्हा त्यांना वाटतं – “अरे हे तर माझ्यासाठी आहे!”
म्हणूनच, फक्त graphics किंवा offers टाकणं हे तुमच्या ब्रँडसाठी पुरेसं नाही. खरं ब्रँडिंग इथूनच सुरू होतं – मनापासून लोकांशी संवाद साधणं.
ब्रॅण्डिंगविषयी अजून वाचायचं आहे? तर भेट द्द्या माझ्या दुसऱ्या ब्लॉग ला
या लेखात मी सांगणार आहे ५ अशा साध्या पण प्रभावी रणनीती, ज्या कोणतंही महागडं टूल वापरून नव्हे, तर आपल्या दृष्टिकोनातून online presence निर्माण करायला मदत करतील
१. ‘Online presence’ म्हणजे तुमचा स्वभाव – तो स्पष्ट ठेवा
खरं ब्रँडिंग म्हणजे logo किंवा tagline नव्हे – ब्रँड म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व.
तुमचं content, तुमचा style, tone, बोलण्याची पद्धत – हे सगळं एकत्रितपणे लोकांना “तुम्ही कोण आहात” हे सांगतं.
उदाहरण:
- जर तुम्ही शिस्तप्रिय व्यक्ती असाल, तर तुमचं content देखील neat, professional आणि organized असावं.
- जर तुमचं व्यक्तिमत्त्व थोडं friendly, humorous असेल – तर तुमच्या पोस्टमध्ये सहजपणा असावा.
Authenticity म्हणजे ब्रँड.
२. सातत्य ठेवा – ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक (Consistency)
तुमचं प्रोफाईल पाहून लोक म्हणाले पाहिजे – “हो, ही पोस्ट त्यांचीच आहे!”
तुमचं ब्रँडिंग एकसंध असेल तर लोक सहज ओळखू शकतात.
- Logo
- Profile picture
- Font style
- Colors
- Caption चा tone
हे सगळं consistent असेल, तर लोकांच्या मनात एक image तयार होते – आणि तीच तुमची ओळख बनते.
उदाहरण – Parle-G. त्यांचा पारंपरिक पॅक, G माणे Genius ही tag, आणि तीच design कित्येक वर्ष टिकवली – म्हणून आजही ती ओळख जगात टिकली आहे.
३. उपयोगी माहिती शेअर करा – प्रभावी ऑनलाइन ब्रँडिंगसाठी महत्त्वाचे
“मी हे विकतो”, “मी ते करतो” असं content फार काळ चालत नाही. लोकांना त्यांच्या उपयोगाची गोष्ट हवी असते.
उदाहरण:
तुमचं logo design agency असेल, तर “मी लोगो बनवतो” असं सांगण्याऐवजी,
“लघुउद्योगांकडून लोगो डिझाइन करताना होणाऱ्या ५ चुका”
“तुमच्या ब्रँडसाठी perfect logo कसा निवडाल?”
असं माहितीपूर्ण content द्या. लोक विचार करतील – “ह्यांच्याकडे जावं का?”
Value-based content नेहमी लक्षात राहतं.
४. Engagement म्हणजे संवाद – हे ब्रँडिंगचं गुपित

Social Media वर likes म्हणजे फक्त visibility. पण comments, shares, replies हे engagement चं खरं मोजमाप आहे.
कसं साधाल संवाद?
- Caption मध्ये प्रश्न विचारा – “तुमचं मत काय?”, “तुमचा अनुभव काय होता?”
- Polls घ्या – लोक मत मांडायला तयार असतात.
- Feedback मांगा – लोकांना वाटतं की त्यांच्या मताला किंमत आहे.
उदाहरण:
“तुमच्या ब्रँडचा tag-line काय असतो? खाली सांगा!”
“तुमचं आवडतं biscuit कोणतं – Parle-G की Bourbon?”
संवाद घडवा, संपर्क वाढवा.
५. विश्वास निर्माण करायचा असेल तर सातत्यपूर्ण ऑनलाइन ब्रँडिंग करा (Online presence)
तुम्ही एक पोस्ट टाकली, एकदा story टाकली आणि मग २ आठवडे गायब – असं असेल तर लोक विसरतात.
Brand Visibility म्हणजे Regular Presence.
- आठवड्यातून २ पोस्ट टाका
- महिन्याला एक informative blog लिहा
- Stories / Reels वर तुमचं काम दाखवा
- WhatsApp / Email वर एक छोटासा newsletter पाठवा
एकदा जमलं की लोक म्हणतील – “हा ब्रँड सतत कामात आहे, विश्वासार्ह आहे!”
सतत Online राहा – पण overload करू नका. योग्य balance ठेवा.
🔚 निष्कर्ष : ब्रँडिंग म्हणजे Rocket Science नाही – मनापासून लोकांशी संवाद साधणं आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा – तुमचं प्रॉडक्ट कितीही चांगलं असो, जर लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत मन जिंकणारी नसेल, तर त्याचा फायदा होणार नाही.
ब्रँड म्हणजे विश्वास
ब्रँड म्हणजे ओळख
ब्रँड म्हणजे संवाद
जर तुम्हाला तुमचं स्वतःचं brand उभं करायचं असेल, तर वरील पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि आजपासून अंमलात आणा.
📢 तुमचं ब्रँड ठामपणे उभं करायचंय? मग लागा कामाला!
पुढील लेखात वाचा –
👉 शून्यापासून यशस्वी ब्रँडिंगची सुरुवात
👉 Digital marketing सुरू करण्यासाठी 5 सोप्पी ब्रँडिंग टूल्स
शून्यापासून यशस्वी ब्रँडिंगची सुरुवात | Discover Powerful Online Branding Secrets!